| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे निवडण्यात 16 व 25 वर्षांखालील महाराष्ट्रच्या संभाव्य संघात रायगडच्या नैतिक सोळंकी, सिद्धार्थ या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या संघाचे सर्व शिबिर पुणे येथे सुरू आहे.
नैतिक सोळंकी व सिद्धार्थ म्हात्रे याची अनुक्रमे 16 व 25 वर्षांखालील महाराष्ट्र संभाव्य संघ निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी ही माहिती दिली.
या दोन्ही खेळाडूंचे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, तसेच सर्व सदस्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच रायगडचा 15 वर्षांखालील मुलींचा संघ प्रथमच महिलांच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. 20 नोव्हेंबरपासून ही स्पर्धा पुण्यात खेळली जाणार आहे. या संघाला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या .