मालगाडी घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत

प्रवासी वाहतुकीवर परिणाम नसल्याची अधिकाऱ्यांची माहिती

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

मालगाडी घसरल्याने रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत सीएसटीएन जेएनपीटी रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाल्याची घटना गुरुवारी (दि. 4) घडली. मालगाड्यांची ताशी मोठ्या प्रमाणात ये-जा असणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर दिवसाला सुमारे 130 मालगाड्या धावत असल्याने अपघातानंतर काही तास मालगाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली असली तरी प्रवासी वाहतुकीला कोणताही त्रास जाणवला नसल्याचा दावा पनवेल रेल्वे प्रशासनाने केला आहे.

रेल्वे नियंत्रण कक्षाकडून दुपारी 11 वाजून 28 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, सीएसटी एनजेएनपीटी 45 बीएलसी मालगाडी पनवेल स्थानकाच्या पाचव्या फलाटाजवळून जात असताना एका कंटेनर ट्रॉलीचा 12 वाजून 25 मिनिटांनी अपघात झाला आणि ती रुळावरून घसरली. ही घसरण कलंबोलीकडे जाणाऱ्या पॉईंटवर आणि फलाट (प्लॅटफॉर्म) क्रमांक 5 च्या क्रॉस-ओव्हर पॉईंटवर झाली. त्यामुळे अप-डाऊन मुख्य लाईनवरची वाहतूक प्रभावित झाली. अपघातग्रस्त कंटेनर नंतर प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात आला.

घटनास्थळ नवीन पनवेल पुलाखाली असल्याने स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जेएनपीटीकडे जाणारी ही मालगाडी वळणावर येताच काही डबे डगमगले आणि रुळाबाहेर गेले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी काही डब्यांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मालवाहतुकीवर या अपघाताचा तात्पुरता परिणाम झाला. रेल्वे सुरक्षा दल आणि पनवेल पोलिसांनी परिसरात बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. या मार्गावरून प्रवासी गाड्या धावत नसल्याने प्रवाशांना या अपघाताचा मोठा त्रास जाणवला नाही. रेल्वे प्रशासनाने अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Exit mobile version