रेल्वेचा प्रवास महागणार

तिकीट दरात 10 ते 50 रुपयांनी वाढ
मुंबई | वृत्तसंस्था |
रेल्वे स्थानकांच्या विकासाठी तसेच पुनर्बांधणीसाठी रेल्वे प्रवाशांच्या खिशाला हात घालण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे स्थानकांच्या कामांसाठी लागणारा निधी आता तिकिटांवर अतिरिक्त पैसे आकारुन उभारला जाणार आहे. या पैशांना स्टेशन डेव्हलपमेंट फी असं नाव देण्यात आलं आहे.
प्रत्येक प्रवाशाकडून तो कोणत्या श्रेणीने प्रवास करत आहे यानुसार ही रक्कम किती असेल हे निश्‍चित केलं जाणार आहे. सर्वासामान्यपणे वेगवेगळ्या श्रेणीमध्ये (म्हणजेच फर्स्ट क्लास, एसी क्लास) प्रवास करणार्‍यांना प्रत्येक तिकिटामागे 10 ते 50 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. हे शुल्क आकारण्यासंदर्भात रेल्वेने वेगवेगळे नियम निश्‍चित केले आहेत. यासंदर्भात रेल्वे बोर्डाचे निर्देशक (प्रवासी विपणन) विपुल सिंघल यांनी एक अधिकृत पत्र जारी करुन माहिती दिली आहे.

Exit mobile version