रेल्वेच्या धडकेने पती,पत्नी ठार

| आपटा | वार्ताहर |
रेल्वेची धडक बसून पती,पत्नीचा मृत्यू होण्याची घटना आपटा येथे घडली.आपटा येथील योगेश खंडू जगताप व रचना योगेश जगताप हे पाताळगंगा नदीवरील रेल्वे पुलावरून जातांना रेल्वेच्या धडकेने पूलावरून खाली पाण्यात पडून मृत्यू  पावले.

जगताप पती,पत्नी सकाळी कामाला जात होते.अपघाताची माहिती मिळताच रसायनी पोलिसांनी तातडीने खोपोलीतील सामाजिक संस्थेच्या मदतीने या दोघांचे मृतदेह नदीच्या पात्रातून बाहेर काढले.यासाठी अभिजीत घरत, अमित गुजरे, भक्ती साठलेकर, गुरुनाथ साठलेकर, अमित ठकेकर, मयूर वाडेकर  यांनी मदत केली.अपघाताची नोंद रसायनी पोलिसात करण्यात आली आहे.

Exit mobile version