रेल्वे कामगारांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

| मुंबई |प्रतिनिधी |

भारतीय सेंट्रल रेल्वेमधील नॅशनल रेल्वे मजदुर युनियनचे महामंत्री कॉ. वेणू नायर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कामगारांनी विविध मागण्यांसाठी मुंबई मंडळ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

नवीन पेन्शन योजना रद्द करा, रेल्वे वसाहती दुरुस्त करा, हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुख सुविधा व तीन महिन्यांसाठी मोफत औषधे मिळावे, 25 हजार रिकाम्या जागा त्वरित भराव्यात, काळा कानून आणू नये व इतर महत्त्वांच्या मागण्यांसाठी मंगळवारी (दि.19) छत्रपती शिवाजी टर्मिनल येथील 18 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून मोर्चा नेऊन मुंबई मंडळ कार्यालयावर प्रचंड निदर्शने केली.

याप्रसंगी वेणू पी. नायर यांनी निदर्शकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, नवीन पेन्शन योजना अन्यायकारक असून, जुन्या पेन्शन योजनेनुसार कामगारांना मूळ पगाराच्या अर्धी पेन्शन मिळाली पाहिजे. कामगार भरती न झाल्यामुळे आहे त्या कामगारांवरती कामाचा ताण वाढतो, तरी रिकाम्या असलेल्या 25 हजार जागा त्वरित भराव्यात. घरभाडे भत्ता 30 टक्के घेता, तर नादुरुस्त रेल्वे वसाहती ताबडतोब दुरुस्त कराव्यात, रेल्वे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी कामगारांना चांगली वागणूक द्यावी, 50 टक्के महागाई भत्ता मूळ पगारात समाविष्ट करावा. अश्या अनेक रेल्वे कामगारांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांवर ताबडतोब तडजोड करावी अन्यथा रेल्वे कामगार प्रचंड आंदोलन करतील असा स्पष्ट इशारा या सभेतून देण्यात आला आहे.

Exit mobile version