। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रविवारी सायंकाळी चौपदरीकरणात केलेल्या भरावाची माती मुसळधार पावसामुळे रस्त्यावर आली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक उशिरापर्यंत ठप्प होती. काही छोटी वाहने मातीत अडकली होती. कल्याण टोलवेज ठेकेदार कंपनीची यंत्रणा तेथे दाखल झाल्यानंतर माती हटविण्यात आली. तसेच मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी व शिवनदीच्या पातळीत वाढ झाली आहे.मुसळधार पावसाने महामार्गावर परशुराम घाटात खेडच्या हद्दीतील चौपदरीकरणांतर्गत केलेला भराव रस्त्यावर वाहून आला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहने अडकून पडली होती. काही दुचाकी व अन्य वाहने चिखलात अडकून पडली होती. यााबतची माहिती मिळताच कल्याण टोलवेज कंपनीची यंत्रणा तात्काळ मागवून ही माती हटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.