रंगांची बरसात अन आरोपांची धुळवड

सत्ताधारी, विरोधकांचा आरोपांचा शिमगा
। मुंबई । प्रतिनिधी ।
कोरोनाची धास्ती संपल्याने आता गुरुवारी राज्यभरात शिमगोत्सव आणि शुक्रवारी धुलिवंदन उत्साहात साजरे करण्यासाठी सारे आतूर झालेले आहेत. मात्र सरकारने खबरदारी म्हणून या दोन्ही सणांसाठी नविन नियमावली जारी करुन उत्साह कमी करण्याचा प्रयत्न केला.तर दुसरीकडे विधीमंडळात बुधवारी सत्ताधारी,विरोधकांमध्ये आरोपांची धुळवड पहावयास मिळाली.परस्परांवर आरोप,प्रत्यारोपांच्या फैर्‍या झाडत उभयतांनी शिमगा साजरा केला.

राज्यात होळी,रंगपंचमीसाठी नियमावली
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे राज्यात कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र रुग्णसंख्या कमी झालेली असली तरी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. दोन वर्षानंतर निर्बंध शिथिल झाले असल्याने यावेळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी करोना संसर्गवाढीला कारणीभूत ठरू नये म्हणून राज्य सरकारने हे सण साजरे करण्यासाठी नियमावली जारी केली आहे.

नवीन नियमावली
रात्री 10 वाजताच्या आत होळीस पेटवा,डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी,दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल. मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई ,महिला तसेच मुलींची खबरदारी ,कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये. धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.

Exit mobile version