पावस नदीकिनारी गावठी दारू

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
तालुक्यातील पावस येथील नदी किनारी परिसरात बेकायदा गावठी स्वरूपात हातभट्टीची 600 रुपये किमतीची 10 लिटर दारु विक्रीसाठी बागळल्याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश दिनकर किर(36) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याविरोधात पूर्णगड पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार अवधुत सुर्वे यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.

Exit mobile version