सावधान! मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली. ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भातील ट्विट केले आहे.

हवामान विभागाने सोमवारी 29 नोव्हेंबरसाठी रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अ‍ॅलर्ट जारी केला आहे. तर, 30 नोव्हेंबरसाठी ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नाशिक आण अहमदगर जिल्ह्यांना यलो अ‍ॅलर्ट जारी केला आहे. तर, सोमवारी यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला नसला तरी ठाणे, मुंबई आणि सोलापूर जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version