। नेरळ । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाच्या वतीने नेरळ ग्रामपंचायतमधील सफाई कर्मचारी यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात प्रतिकूल परिस्थितीतही नागरिकांच्या आरोग्याची आणि परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई कामगारांसाठी ही मोठी आवश्यक वस्तू समजली जात आहे. मनसे रोजगार विभागाच्या वतीने केलेल्या या मदतीबद्दल जिल्हा अध्यक्ष सतीश कालेकर यांचे कौतुक होत आहे.
नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात मनसेच्या रोजगार आणि कामगार सेल यांच्या माध्यमातून रेनकोट वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे, महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार सरचिटणीस सिद्धी आंगणे, जिल्हा अध्यक्ष सतीश कालेकर, कर्जत महिला तालुका अध्यक्षा दर्शना कालेकर, नेरळ शहराध्यक्ष हेमंत चव्हाण, उपतालुका संघटक जितेंद्र रुठे, विनोद शेंडे, अमोल कालेकर, किरण राणे, किशोर कालेकर, नारायण कालेकर, शाखाध्यक्ष बिरदोले, नमिता कालेकर, पंकज बुंधाटे, भालचंद्र राणे, चंदू राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. हा उपक्रम मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे तसेच रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर आयोजित केला जात आहे.
सफाई कर्मचारी नेरळसारख्या शहरीकरण झालेल्या गावात दिवसभर स्वच्छता राखण्याचे काम करतात. त्यांच्या सेवेला प्रोत्साहन देण्याबरोबरच पावसाळ्यात त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे जिल्हा अध्यक्ष सतीश कालेकर यांनी स्पष्ट केले.
सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप
