Rains begin: मुरूड शहरात पावसाच्या सरी

उकाड्यातून नागरिकांना दिलासा

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असून मुरूड शहरांसह पंचक्रोशी भागात अनेक ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पूर्व पावसाच्या रिमझिम सरींमुळे उकाड्यातून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे तापमानात घट झाली असून वातावरण आल्हाददायक झाले आहे. शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण असून खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदाजानुसार यंदा मान्सून महाराष्ट्रात नेहमीपेक्षा थोडा लवकर पोहोचण्याची शक्यता आहे.

Exit mobile version