हवामान विभागाचा इशारा
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र असून, आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. पुणे, ठाणे, रायगड, घाटमाथा भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणाला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने राज्यातील बरीचशी धरणेदेखील पूर्ण क्षमतेने भरली आहेत. दरम्यान आजदेखील राज्यभरात पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.







