मुंबई-गोवा महामार्गाला फटका; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
| रत्नागिरी | वृत्तसंस्था |
अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालपर्यत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात 114 मीटर पाऊस झाला. कोकणामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावांसोबत संपर्क तुटला. मुसळधार पावसाचा मुंबई-गोवा महामार्गाला देखील मोठा फटका बसला.
रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. संगमेश्वर तालुक्यात 142 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यातील कसबा, शास्त्री पूल भागाला पावसाने जोरदार झोडपले. तालुक्यातील माखझन बाजार पेठेत पुराचे पाणी शिरले. यामुळे बाजारपेठेतील धोका वाढणार आहे. प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रत्नागिरीमधील मंडणगड तालुक्यात सकाळी सहा वाजता मुसळधार पावसामुळे भिंगळोली येथील बस डेपो व शासकीय रेस्टहाऊसमध्ये पुराचे पाणी शिरले होते. दरम्यान या पावसामुळे कोकणवांसीचा पुरता दाणादण उडवली होती.
कमी दाबाचा पट्टा तयार
अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालपर्यत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात 114 मीटर पाऊस झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 143 किलोमीटर पाऊस झाला आहे. चिपळूणमध्ये 134, मंडणगड 114, संगमेश्वर 142 मिलिमीटर पाऊस झाला आहे.