। म्हसळा । वार्ताहर ।
ठाणे वनवृत्त वनविभाग रोहा, महाड-म्हसळे-श्रीवर्धन सोसायटी ऑफ इको एन्डजार्ड्स्पिसिज कंझर्वेशन अँड प्रोटेक्शन यांच्या माध्यमातून श्रीवर्धन येथे वनविभागाने जोपासलेली गिधाड्यांची पिल्ले पुन्हा त्यांच्या अधिवासात सुरक्षित सोडण्याचा उपक्रम म्हसळा तालुक्यातील भेकर्याचा कोंड येथे आयोजित करण्यात आला. या प्रसंगी आपल्या मार्गदर्शनात राज्याचे मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाश यांनी रोहा वनविभागाचे कौतुक करून रोहा वनक्षेत्राची कामगिरी समाधानकारक असल्याचे सांगितले. रोहा वनविभागाअंतर्गत म्हसळा वनविभागाने हाती घेतलेला गिधाडसंवर्धन प्रकल्प निश्चितपणे उत्कृष्ठ असून अशा माध्यमातून गिधाडांचे संवर्धन होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. तीन महिने गिधाडांची पिल्ले सांभाळून पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडणे ही बाब वनविभागाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असल्याचे उपवनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत यांनी सांगितले. याप्रसंगी राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक, वन्यजीव सुनील लिमये, एस. व्ही. रामराव, अप्पासाहेब निकत, आशिष ठाकरे, विश्वजित जाधव, मिलिंद राऊत, निलेश पाटील, प्रेमसागर मेस्त्री, प्रशांत पाटील, आर. बी. साऊ, मोहन शिंदे, गजानन शिंदे, शंकर पाटील, किशोर गुलगुले, चिरगांव-बागाची वाडी-भेकर्याचा कोंड, पांगळोली वनसमिती व ग्रामस्थ, संजय नाईकनवरे, वनपाल संजय गिरी, गजानन लालछोटे, अमोल सोनार, इंगोले, रामकृष्ण कोसबे आदी मान्यवर उपस्थित होते.