रायसोनी स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धा

115 खेळाडूंनी नोंदविला स्पर्धेत सहभाग; खुल्या गटात उमेश कुलकर्णी प्रथम

| अलिबाग | प्रतिनिधी |

जी.एच.रायसोनी स्मृती चषक रायगड स्पर्धा रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेने आयोजित केली होती. या स्पर्धेत 115 जणांनी सहभाग नोंदविला. पंच म्हणून आविष्कार मारभळ, चंद्रशेखर पाटील, श्रेयस पाटील, सुशील गुरव, तुषार देशपांडे यांनी काम पाहिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विलास म्हात्रे, सुशील गुरव, चंद्रशेखर पाटील, आल्हाद पाटील, स्नेहल म्हात्रे आदी उपस्थित होते.

13 वर्षाच्या गटामध्ये प्रथम क्रमांक आशुतोष प्रसाद, द्वितीय क्रमांक हर्ष दळवी, तृतीय क्रमांक यश पाटील, चतुर्थ क्रमांक मृण्मयी केळकर, पाचवा क्रमांक आदित्य भोस्टेकर आणि सहावा क्रमांक स्वर पटेल यांनी पटकावला. स्वरा साईदेव आणि ओजस्वी थळे यांनी रोख रक्कम मिळविली. अकरा वर्षाखालील मुलीमध्ये ओवी म्हात्रे, निधी रोगे, गार्गी राऊत, अनुष्का कोळी आणि किमया बारगुडे यांनी तर मुलांच्या गटांमध्ये कार्तिक बांदल, विहांग पाटील, आईद्वात ठमके, नवनाथ भगत आणि सार्थ पोवळे, नऊ वर्षाच्या गटांमध्ये अन्वय कुलकर्णी, मानस पेंडसे आणि अर्णव पेणकर तर 9 वर्षाचे गटात आर्वी राणे, मृण्मयी केळकर आणि शर्वरी कदम तर ऋषिकेश वेळे यांनी ट्रॉफी देण्यात आल्या.



सतरा वर्षाखालील गटांमध्ये प्रथम क्रमांक कौस्तुभ भगत, गौतम पवार, प्रथमेश वेल्हाळ, विदेहा मेटकर, अपेक्षा मारभळ, सेजल चांदोरकर, आर्या जाधव, अविनाश ल्हासे, रुद्राक्ष खुतवाल आणि अस्मित पल्लकपरांबिल यांनी रोख बक्षीस आणि ट्रॉफी मिळवली. उत्तेजनार्थ म्हणून अपेक्षा राऊत, अथर्वा घरत, वैदेही तेटगुरे, बसील फकी, श्रेयश भोईर, अर्णव पालकर, स्मित कोळवणकर आणि शर्विल कदम यांनी ट्रॉफी मिळविल्या.

खुल्या गटांमध्ये प्रथम क्रमांक उमेश कुलकर्णी, धीरज पाटील, विश्वदीप जाधव, सुयश वाटोरे, अतुल काकडे, अमर गोडबोले, प्रशांत चव्हाण, वेदांत मेहता, गोवर्धन वसावे आणि काशीद मामुनकर यांनी बक्षिसे, ट्रॉफी मिळवली तर उत्तेजनार्थ शिफा शेख, ज्येष्ठ खेळाडू गटामध्ये श्रीकांत शेरे, जनार्दन पुगावकर, प्रकाश कुमार केंद्रे, तसेच अलिबाग खेळाडू म्हणून राजेंद्र वेळे, भावेश वेळे, सन्मिल गुरव, अविनाश ल्हासे, मंदार शिंदे आणि अंश पाटील यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अलिबागच्या उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांनी शाळांमध्ये बुद्धिबळाची माहिती, प्रचार आणि प्रसारासाठी काही कार्यक्रम घेण्याची माहिती दिली. स्पर्धेच्या बक्षीस समारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्षा ॲड.मानसी म्हात्रे, नगरसेविका ॲड. अश्विनी ठोसर, अलिबाग कारागृह, अधीक्षक विशाल बांदल आणि अमर गोडबोले आदी उपस्थित होते.

Exit mobile version