| मुंबई | प्रतिनिधी |
राज ठाकरे नक्की कोणाच्या शाखांना भेट देणार? भाजपच्या की संघाच्या असा खोचक सवाल संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना केला आहे. राज ठाकरेंच्या कुठे शाखा आहेत. राज ठाकरे मोदींच्या चरणी विलीन झालेले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावे म्हणून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यानंतर मनसैनिकांनी अनेक ठिकाणी महायुतीचा प्रचार केला. अनेक मतदारसंघात मनसेने महायुतीच्या प्रचाराची धुरा सांभाळली. राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी शुक्रवारी मुंबईतील शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत एकाच मंचावर आले. राज ठाकरे यांच्यासाठी पंतप्रधानांचा प्रोटोकॉल पण बाजूला ठेवण्यात आला. आता राज ठाकरे यांच्यावर संजय राऊत यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.