राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव
। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्यामध्ये काहीच चूक नाही. आमच्यातील भांडणं छोटी आहेत. परंतु, महाराष्ट्र खूप मोठा आहे. मी युतीसाठी उद्धव ठाकरेंना प्रस्ताव पाठवला आहे, असे मोठे विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे.
मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
सध्याच्या राजकीय समीकरणात राज आणि उद्धव एकत्र यावेत, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. अशातच मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का?, असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना विचारला. यावर राज ठाकरे म्हणाले की, मी युतीसाठी उद्धव ठाकरेंना प्रस्ताव पाठवला आहे. तसेच, मराठी माणसाच्या अस्तित्वापुढं वाद भांडणं क्षुल्लक आहे. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही. परंतु, विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही, असे राज ठाकरे म्हणाले.