राजन साळवी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात दाखल

भावासह पुतण्याची चौकशी सुरु

| अलिबाग | प्रतिनिधी |

उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना बुधवारी 27 डिसेंबरला अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र ते हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा चौकशीसाठी 10 जानेवारीला बोलावण्यात आले. त्यानुसार साळवी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांचा भाऊ दिपेश व पुतण्या दुर्गेश या दोघांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षभरापासून आमदार राजन साळवी व त्यांच्या कुटुंबियांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरु आहे. त्यांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती या विभागामार्फत घेतली जात आहे. त्यासाठी साळवी यांना अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात वारंवार चौकशीसाठी बोलवले जाते. बुधवार दि. 27 डिसेंबर रोजी साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र ते हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना नोटीस देऊन 10 जानेवारीला बोलावण्यात आले. दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास राजन साळवी, त्यांचा भाऊ दिपक साळवी व पुतण्या दुर्गेश साळवी असे तिघेजण अलिबागच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दाखल झाले. दिपक साळवी व दुर्गेश साळवी यांची आज चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यासोबत आमदार राजन साळवीदेखील आहेत. दरम्यान, आमदार राजन साळवी अलिबागमध्ये दाखल झाल्यावर उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

Exit mobile version