| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्यावतीने विभागस्तरीय प्रवास वर्णन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात राजेंद्र अंबिके यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड या पाच जिल्ह्यांतील स्पर्धकांमधून त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.
शिक्षणातील गुणवत्ता संवर्धन तसेच शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षकांना 21व्या शतकातील आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी तसेच शैक्षणिक व प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या स्पर्धा तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर घेण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत आयोजित ‘प्रवास वर्णन लेखन’ या विभागस्तरीय स्पर्धेत राजेंद्र अंबिके यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई विभागाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे.







