शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या राज्याध्यक्षपदी राजेश सुर्वेंची

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद प्राथमिक विभाग या शिक्षक संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष राजेश सुर्वे यांची फेरनिवड झाली आहे. नाशिक येथे पार पडलेल्या अधिवेशनात सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
शिक्षकांच्या अनेक प्रश्‍नांवर आवाज उठवला. विद्यमान कार्यकारिणीची मुदत येत्या 29 नोव्हेंबर रोजी संपत आहे. संघटनेचे तिसरे राज्यव्यापी अधिचेशन 13 व 14 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे पार पडले. यात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षक नेते रोहकले गुरूजी यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. राजेश सुर्वे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.
आपल्यावर पुन्हा एकदा विश्‍वास दाखवल्याबददल राजेश सुर्वे यांनी सर्व सभासदांचे आभार मानले. भविष्यातील कालावधीमध्ये शिक्षकांसमोर असणार्‍या अनेक समस्यांना सामोरे जाण्यासाठी व प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक होण्यासाठी राज्य कार्यकारणीच्यावतीने जिल्हा व तालुका स्तरावर संपर्क अभियानाच्या माध्यमातून शिक्षकांशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्‍वासित केले.
नवीन कार्यकारिणी राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे , कार्यवाह संजय पगार, राज्य सल्लागार सुधाकर मस्के, मधुकर उन्हाळे, प्रकाश चतरकर, पुरुषोत्तम काळे, सुरेश दंडवते, भरत मडके, बाबुराव गाडेकर, बाबूराव पवार, प्रकाश चूनारकर, डॉ. सतपाल सोवळे, राजेंद्र नांद्रे, दिलीप पाटील, संजय शेळके, अविनाश तालापल्लीवार, सुनील केने ,विजय पाटील,भगवान घरत, रविकिरण पालवे,वैशाली कुलकर्णी,दिपिका चौरे, छाया पाटील याची निवड करण्यात आली.

Exit mobile version