राजेश सुर्वेंकडून पाटील कुटूंबियांचे सांत्वन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

वायशेत येथील सिताराम आत्माराम पाटील यांचे चुलत बंधू रविंद्र धर्मा पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ व रायगड जिल्हा शिक्षक पतपेढी अलिबागचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी वायशेत येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन पाटील कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

रविंद्र पाटील यांचे 13 नोव्हेंबरला अल्पशा आजाराने निधन झाले. राजेश सुर्वे यांच्यासह पतपेढीचे संचालक नितीन पाटील व कर्मचारी यांनी 22 नोव्हेंबरला वायशेत नाका येथील पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सुर्वे म्हणाले की, रवि पाटील यांनी शिक्षक पतपेढी अलिबागमध्ये 30 वर्षे प्रामाणिक सेवा केली. एक कार्यक्षम कर्मचारी ते होते, असे म्हणत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. नितीन पाटील यांनी सांगितले की, रवि पाटील यांना सहकाराचा अभ्यास असल्याने ते जनाधार पतपेढी भालनाका येथे संचालक म्हणून निवडून गेले. यावेळी माणगावचे शाखा प्रमुख तथा सेवानिवृत्त सिताराम पाटील यांनी सांगितले की, रवि पाटील यांना भजनाची फार आवड होती. उत्तम मृदूंग वादक होते. सहकार क्षेत्राबरोबरच ग्रामविकास मंडळ वायशेत या संस्थेचे ते सेक्रेटरी होते. दरम्यान सुर्वे यांनी सांत्वनपर भेट घेतल्याबद्दल सिताराम पाटील यांनी आभार व्यक्त केले.

Exit mobile version