राजीव गांधी क्रांतिकारी : नेते डॉ. मर्दाने

। नेरळ । प्रतिनिधी ।

18 वर्षांच्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार बहाल करून देशाच्या मुख्य प्रवाहात आणणारे दिवंगत माजी प्रधानमंत्री राजीव गांधी हे खर्‍या अर्थाने आधुनिक भारताचे क्रांतिकारी नेते होते. तर भारताच्या संगणक क्रांतीचे जनक, पंचायत राज व्यवस्थेद्वारे सत्तेचे विकेंद्रीकरण करून स्त्रियांना 33 टक्के आरक्षणाची सोय करणारे प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाची मुहूर्तमेढ राजीव गांधी यांनी रोवली, असे उद्गार कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत भात संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी येथे केले.

कर्जत येथील भात संशोधन केंद्रात उपस्थित शास्त्रज्ञांनी भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. कनिष्ठ भात पैदासकार डॉ. जालिंदर देवमोरे यांनी सद्भावना दिवस प्रतिज्ञा उपस्थितांकडून वदवून घेतली. यावेळी कृषी विद्यावेत्ता डॉ. गंगावणे, मृदशास्त्रज्ञ डॉ. देवदत्त जोंधळे, शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र गवई, कीटकशास्त्रज्ञ डॉ. वैशाली सावंत व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version