नशामुक्ती केंद्रातून राजीव मेहरा बेपत्ता

| वावोशी | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील छत्तीशी विभागातील डोणवत-ठाकूरवाडी येथील व्ही केअर वेलनेस फाउंडेशन नशामुक्ती केंद्रातील रुग्ण राजीव मित्तरलाल मेहरा (51) 20 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 5:30 वाजता उपचार केंद्रातून निघून गेला आणि तो अद्याप परत आलेला नाही. खालापूर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून त्याचा शोध सुरू आहे. बेपत्ता झालेल्या या व्यक्तीची उंची अंदाजे 172 सें.मी., गोऱ्या रंगाची त्वचा, केस वाढलेले, चेहरा उभट आहे. अंगात लाल पट्ट्यासह फुल टिशर्ट, निळ्या रंगाचा डीदास जॅकेट, निळसर ट्रॅक पँट आणि पांढरे बूट होते. कोणीही त्याला पाहिले असल्यास किंवा त्याबाबत माहिती मिळाली असल्यास खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन खालापूर पोलिसांकडून करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी: 9673187254 पोलीस हवालदार गायकवाड: 97651 36205 पोलीस हवालदार जगधने: 9168445676 संबंधित प्रकरणी अधिक माहिती खालापूर पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध आहे.

Exit mobile version