राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण

| तळा | वार्ताहर |

तरुणींवरील वाढते अत्याचार लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे संपूर्ण राज्यभर राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला-वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि द.ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा येथे विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

तीन दिवसीय प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. गो.म. वेदक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन महेंद्र कजबजे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. याप्रसंगी बाल विकास प्रकल्प अधिकारी दिपाली शेळके, द.ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप ढाकणे, पर्यवेक्षिका कीर्ती भाटकर, भारतीय स्त्रीशक्तीच्या ज्योती पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी राहुल डाके, स्वसंरक्षण प्रशिक्षक मेघेश मोरे व विनायक सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी दिपाली शेळके, राहुल डाके, कीर्ती भाटकर, प्रा. डॉ तृप्ती थोरात, प्रा. भक्ती कुळकर्णी, प्रा. लता गायकवाड, अंगणवाडी सेविका आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version