। उरण । प्रतिनिधी ।
नुकत्याच झालेल्या 50 व्या गोशीन-रियु कराटे फेडरेशन मलेशिया आयोजित कराटे स्पर्धा, ब्लॅकबेल्ट परीक्षा व पंच परीक्षा यांचे 11 ते 14 डिसेंबर या कालावधीत मलेशिया येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सिहान राजु गणपत कोळी यांनी मास्टर काता सोचीन व गोज्युशियोशो सादर करून परिक्षेत वयाच्या 61 व्या वर्षी 6 डिग्री ब्लॅकबेल्ट उत्तीर्ण झाले. तसेच, त्यांनी पंच परीक्षाही पास केली आहे. त्यांचे सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, सिहान राहुल तावडे, मतीआनंद, आनंद खारकर, कृष्णा पाटील, भुपेंद्र माळी, रेश्मा माळी, राजेश कोळी, परेश पावसकर, अंजा माने, अमिता घरत, आमिशा घरत, भुषण म्हात्रे, अनिष पतिल, शुभम ठाकुर, विग्नेश कोळी, अॅ. नितिन मोहिते, अॅ. शितल गणेशकर, निकिता कोळी, विनय पाटील, कृषाणु कोळी, सुलभा कोळी या सर्वांच्या सहकार्यामुळे सिहान राजु कोळी यांना यश प्राप्त करता आले आहे.