गणपती सजावट स्पर्धेत राजू पिचिका प्रथम

। पेण । वार्ताहर ।
साप्ताहिक गर्जा रायगडच्या माध्यमातून शिक्षक राम भोईर, किशोर पाटील, विनोद म्हात्रे यांनी पर्यावरणस्नेही गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये लोकमान्य हाउसिंग सोसायटी येथील राजू पिचिका यांच्या इकोफ्रेंडली गणपती सजावटीला प्रथम क्रमांकाचे पारीतोषिक मिळाले आहे.

पर्यावरणस्नेही गणपती सजावट स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातुन अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्या स्पर्धकांमध्ये अंतिम दहामध्ये नितिन पाटील (रामवाडी), सागर मारुती पाटील (हनुमान पाडा), डॉ. दिनेश गावंड (दुरशेत), मंगेश नाईक (पेण कोंबडपाडा), विजय विष्णू मोकल (वडखळ), मयुर सुधीर पाटील (बोरगाव), अभियान पाटील (सागर सोसायटी), राजू पिचीका (पेण लोकमान्य हाउसींग सोसायटी), संजय कमळाकर (डंगर बळवली), गजानन बाळाराम पाटील (मुक्ताईनगर पेण) या गणेशभक्तांची निवड करण्यात आली होती. अंतिम चार विजेत्यांचा सन्मान 9 फेबु्रवारी 2023 गर्जा रायगडच्या वर्धापन दिनी करण्यात येणार आहे.

Exit mobile version