| पाताळगंगा | वार्ताहर |
राजिप शाळा माजगांव येथे बुधवारी (दि.28) राष्ट्रीय विज्ञान दिनांचे औचित्य साधून विविध प्रयोग साकरण्यात आले. त्याच बरोबर प्लास्टिक पर्यावरणांस घातक असून त्यांचे दुष्परिणाम अधिक असल्यांने प्लास्टिक रॅली काढून हातात फलक घेवून पर्यावरण वाचविण्यांचा संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांच्या घोष वाक्यांनी परिसर दणाणून सोडला. या उपक्रमास किरण कवाद, भुषण पिंगळे, रेखा जाधव, नामदेव वाघमारे, राजेश पाटील, बाळू पादिर यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यास विषयी मार्गदर्शन केले.