| अलिबाग । प्रतिनिधी ।
सकल मराठा समाज अलिबाग तालुकामार्फत शुक्रवारी अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे, आंदोलनादरम्यान जे गुन्हे दाखल झाले आहेत, ते त्वरित मागे घ्यावे या मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले. सकाळी दहा वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात झाली.
एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला मराठा समाजातील तरुणांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभाग झाले होते. या उपोषणामध्ये नरेश सावंत, समरेश शेळके, अभय म्हामूणकर, उल्हास पवार, दिपक गावडे, जया सावंत आदी मराठा समाज सामील झाला आहे . उपोषणानंतर संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा कँडल मार्च काढण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय येथून ही रॅली तहसील कार्यालय, अलिबाग येथील कन्याशाळा, राम मंदिर, महावीर चौक, आंबेडकर चौक, एसटी स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशकाढण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव, महिला उपस्थित होते.