। पेण । वार्ताहर ।
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी बांधवांनी पेण आंबेडकर चौकातून रॅलीला सुरूवात केली. या आदिवासी बांधवांच्या रॅलीला शुभेच्छा देण्यासाठी नायब तहसिलदार प्रसाद कालेकर, व नायब तहसिलदार सुनिल जाधव, अरूण शिवकर, जिपचे माजी सभापती महादेव दिवेकर, पंचायत समिती सदस्य निलकंठ दिवेकर हे उपस्थित होते.आदिवासी बांधवांनी भारतरत्न डॉ.बाबा साहेब आंबेडकरांच्या अर्ध पुतळयाला पुष्पहार घालून रॅलीला सुरूवात केली. आदिवासी बांधव भगिनींनी घोषणा देऊन सपूर्ण परिसर दणानुन सोडले. त्यानंतर या रॅलीचे रुपांतर सभेत झाले. यावेळी महादेव दिवेकर यांनी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करून आदिवासी दिनाचे महत्व सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जोमा दरोडा, हरेश विर, जर्नादन भस्मा, महेश ठोंबरा, महादु ढुंगणा, राम लेंडी, जानू अधार, दामू ठोंबरा यांनी विशेष मेहनत घेतली.