पक्षात युवकांना संधी देणार – मोहन गुंड
। बीड । प्रतिनिधी ।
गेवराई तालुक्यातील कुकडगाव येथील युवक राम नवले यांनी शेकापक्षात भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली रविवारी जाहीर प्रवेश केला. राम नवले हे समाज हिताचे काम करणारा युवक म्हणुन त्यांची चांगली ओळख आहे.
सध्या देशात जातीवादी शक्तीच्या विचाराचे सरकार शेतकर्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून शेतकर्याला देशोधडीला लावण्याचे काम करत असताना शेतकरी आत्महत्येचा आकडा हजारोंच्या संख्येने वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांच्या बाजूने भक्कमपणे लढणारा शेतकरी कामगार पक्ष हाच शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देऊ शकतो.
यामुळे प्रमाणिक काम करण्याची इच्छा आसणार्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात काम करावे. येत्या काळात पक्षामध्ये युवकांची मोठी फळी निर्माण करणार असून शेतकर्यांच्या हक्कासाठी शेतकरी कामगार पक्ष हा लढा उभारणार असल्याचे मोहन गुंड यांनी सांगितले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे अॅड.नारायण पाटील, दत्ता प्रभाळे, भीमराव कुटे आदींसह गावकर्यांची उपस्थिती होती.