रामा म्हात्रे यांचे निधन

| पेण | प्रतिनिधी |

पेण वढाव येथील पोस्टमन रामा पिठू म्हात्रे यांचे वयाच्या 97 व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. पोस्टमन म्हणजे आनंद व दुःख यांची बातमी पोहोचवणारा पोस्टाचा दूत. आज इंटनेटच्या युगात पोस्टमन हीच प्रजाती नष्ट होत चालली असली तरी, एक काळ असा होता की, पत्र घेऊन येणारा पोस्टमन हा देवदूतापेक्षा कमी नव्हता. रामा पोस्टमन यांनी पेणमधील वाक्रुळ, अलिबागमधील चौल, रेवदंडा येथे व इतर ठिकाणी पोस्टमनचे काम केले. त्यांनी 38 वर्षे पोस्टाची सेवा केली.

सेवानिवृत्तीनंतर अकादेवीचे ते परमभक्त होते. त्यांनी अकादेवीचे पुजारी म्हणूनदेखील काम पाहिले. त्यांना गावातील देवस्थानाचे प्रखर कथा, किर्तन, प्रवचन भजन तसेच सामाजिक क्षेत्रातील काम याची आवड होती. त्यांची मुले लहान असतानाच त्यांच्या पत्नीला देवाज्ञा झाली. त्यावेळी त्यांनी आपल्या मुलांना आईची माया देऊन त्यांना चांगले संस्कार, चांगले शिक्षण देऊन कामाला लावले. आजही त्यांची तीन मुले पोस्टात काम करतात. त्यांना पाच मुले व दोन मुली, नातवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर वाढव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Exit mobile version