‌‘रामा पेट्रेाकेमिकल’ने थकविली कामगारांची देणी

कंपनी बंद झाल्याने कामगार 23 वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत

| नेरळ | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील रामा पेट्रोकेमिकल ही कंपनी 2000 साली बंद झाली. त्यानंतर 400 कामगार देशोधडीला लागले आणि कामगारवर्गाने न्यायासाठी लढा देत आहेत. दरम्यान, या बंद पडलेल्या कामगारांनी आ. महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन साकडे घातले आहे. तर, पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना भेटून निवेदन दिले. दरम्यान, आ. थोरवे यांना याप्रश्नी लक्ष घालण्याची सूचना केली आहे.

रामा पेट्रोकेमिकल ही कंपनी 23 वर्षांपासून बंद असून, कामगारांची आर्थिक देणी दिलेली नाहीत. याबाबत नोकरी गेलेल्या कामगारांनी औद्योगिक न्यायालय ठाणे येथे कंपनीविरुद्ध दावा दाखल केला आहे, तसेच खालापूर तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि कामगार आयुक्त पनवेल यांना निवेदन दिले आहे. कंपनी बंद करून मालकांनी कामगारांचे आयुष्य देशोधडीला लावले आहे. 23 वर्षे कामगारांवर उपासमारीचा सामना करत काही कामगारांचा मृत्यू झाला, काहींना हार्ट अटॅक, अर्धांगवायू व डिप्रेशन आले हे वास्तव व सत्य आहे. कंपनीने कामगारांची आर्थिक देणी देऊन नंतरच विक्रीचा व्यवहार करावा, कामगारांचे देशोधडीला लागलेले आयुष्य व संसार वाचवावेत अशी मागणी कमागारांची आहे.

रामा पेट्रोकेमिकल लिमिटेड वाशिवली पातळगंगा यांचे व्यवस्थापनाने मालक संचालक यांनी कंपनीची जागा विक्रीस काढली आहे असे समजते; परंतु संबंधित कारखानदार संघटना, कंपन्या, व्यक्ती यांनी सदर जागेचा खरेदीचा व्यवहार करू नये अगर भाडे वा मालकी तत्त्वावर घेऊ नये यात लक्ष घालण्याची मागणी कामगारांनी आ. महेंद्र थोरवे यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version