| पाली /बेणसे | वार्ताहर |
बौद्ध समाज युवा संघ रायगड महिला परिवारतर्फे नेल्सन मंडेला निवासी आश्रम शाळा नागोठणेत त्यागमुर्ति रमाई जयंती उत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी माता रमाई यांना वैचारिक आणि शैक्षणिक उपक्रमाने अनोखे अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या नृत्याने झाली. अनेक लहान विद्यार्थ्यांनी माता रमाई चा त्याग, योगदान आणि आजची स्त्री याची सांगड घातली. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आयुनी ममता भगत यांनी रमाई जीवनपट सादर केला.
यावेळी मुंबई येथून अंधश्रध्दा निर्मूलनचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी, अनिता पवार, निलीमा जाधव, निर्मला माने, रिना ओंमकार, जितेंद्र मुंडकार, शाम कदम, संतोष गायकवाड, भगवान बिनेदार, दिपक दाभाडे, मनोहर शिंदे, संजय गायकवाड, श्वेता मोहीते, सुनिता दाभाडे, सुनिता बिनेदार, माया डोंगरावर, योजना रणवरे, सविता दाभाडे, संध्या गायकवाड वैशाली गायकवाड, पुनम सावंत, अंकुश कांबळे, तसेच नवनाथ डोंगरगावर, तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते.






