| पनवेल | प्रतिनिधी |
रमेश गोरे हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील असून त्यांची शेतकरी कामगार पक्षावरील निष्ठा पाहून माजी बाळाराम पाटील यांनी त्यांना कामोठे शहर उपाध्यक्षपदावर नियुक्ती केले आहे. तसेच, आदर्श मित्र मंडळाचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. सेक्टर 18 मध्ये मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी ते दरवर्षी मैदानी खेळाचे सामने भरवतात. अपुऱ्या पाणी पुरवठेबाबत त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून कामोठेमधील रस्ते दुरुस्त व्हावेत, यासाठी देखील त्यांनी पालिकेकडे आवाज उठवला होता. तसेच, सेक्टर 21 मध्ये जलकुंभ व्हावा, यासाठी देखील सिडकोकडे आणि पालिकेकडे मागणी केली होती. त्यामुळे प्रभाग 13 मधील सर्व समस्या त्यांना ज्ञात आहे. त्यामुळे ते प्रभाग 13 मधून अगामी महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून ते बहुमताने निवडून येतील, असे मत स्थानिक शेकाप कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.






