रामेश्‍वर कला महोत्सव उत्साहात

| पेण | प्रतिनिधी |

पेणमध्ये निसर्ग ग्रुपच्या माध्यमातून गेली दोन वर्ष रामेश्‍वर मंदीर पेण येथे रामेश्‍वर कला महोत्सव भरवण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन शनिवार (दि.26) अ‍ॅड.मंगेश नेने, श्रीकांत देवधर, आनंद देवधर, योगेश निखारे, यांच्या हस्ते करण्यात आले.

दि. 27 जानेवारी रोजी मृगज कुंभार व स्वराज वांद्रे यांचे गणेश मूर्तिकला प्रात्यक्षिक तथा चर्चासत्र, दि.28 जानेवारी रोजी अक्षय पै यांचे निसर्गचित्रण प्रात्यक्षिक, अभिषेक आचार्य यांचे व्यक्ती चित्रण, स्वरगंध ग्रुप पेण यांचे संगीतसंध्या कार्यक्रम सादर केले. या महोत्सवामध्ये राज्यातून शेकडो कलाकार विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे रामेश्‍वर कला महोत्सव खर्‍या अर्थाने पेणमधीलच नव्हे तर राज्यातील कलाकारांसाठी व्यासपीठ निर्माण करुन देणारा ठरला. महोत्सवात रांगोळी, चित्रकला, शिल्पकला, मूर्तिकला, गणेशमूर्तीकला, छायाचित्रणांचे प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 26 ते 29 जानेवारी रोजी जास्तीत जास्त कलाप्रेमींनी हा प्रदर्शन पाहण्याचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋतुजा हेलवाडे हिने केले.

Exit mobile version