रामेश्‍वर महाराजांना गुणिजनरत्न जीवनगौरव

| पनवेल | वार्ताहर |
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांचे वतीने रामेश्‍वर महाराज नरे यांना राज्यस्तरीय गुणिजनरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुबई यांचे वतीने सांस्कृतिक सभागृह, मुंबई शहर येथे मनिष कदम (संमेलन, समन्वयक) व ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर (कीर्तनकार, कवी, पत्रकार) यांच्या हस्ते रामेश्‍वर महाराज से यांना राज्यस्तरीय गुणिजनरत्न जीवनगौरव पुरस्कार-2020 हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. रामेश्‍वर महाराज नरे हे आदिवासी समाज बांधवामध्ये जात, धर्म, पंथ, पक्ष असा भेदभाव न करता अविरत मेहनत घेत आहे, त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबाबत रामेश्‍वर महाराज नरे यांचे सर्व स्तरामधून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version