रामेश्वर नरेंची कोकण आयुक्तांकडे तक्रार
| पनवेल | प्रतिनिधी |
सध्या रायगड जिल्हा परिषदेमधील कोणाचा अंकुश नसल्यामुळे तेथे जावं तर अधिकारी उपस्थित नसतात. या अनागोंदी कारभाराविरोधात आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासनाचे रामेश्वर नरे यांनी संताप व्यक्त केला असून, याबाबत त्यांनी कोकण आयुक्त प्रशासन विभाग कोकण भवन येथे पत्र दिले आहे.
या पत्रात रामेश्वर नरे यांनी म्हटले आहे की, मी स्वतः जिल्हा परिषद रायगड अलिबाग येथे गेलो होतो असता तेथे एकही अधिकारी उपस्थित नव्हते. 24 जुलैला पुन्हा मी व्हिजिटला गेलो होतो, तेव्हासुद्धा अधिकारी उपस्थित नव्हते. रायगड जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून कामासाठी गोरगरीब लोक येत असतात, अधिकारी जागेवर उपस्थित नसल्यास लोकांचे येणे-जाणे फुकट जाते. मी स्वतः जिल्हा परिषदला गेलो; परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आजपर्यंत भेट झाली नाही. रायगड जिल्हा परिषदेवरती जिल्हाधिकारी व्यवस्थित आदेश देत नाहीत असे दिसून येत आहे, असेच चालले तर मला पुन्हा एक वेळ रायगड जिल्हा परिषदेच्या विरोधात उपोषण आमरण उपोषण करावे लागेल.
सन 2025 वर्षाचा आदिवासी व दिव्यांगासाठी अर्थसंकल्पदेखील व्यवस्थित बनवला नसून, याची चौकशी होऊन तो व्यवस्थित बनवण्यात यावा. नेहमी जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयामध्ये गेले असता अधिकारी असले तर अधिकारी नेहमी विसी (व्हीडीओ कॉल) मध्ये आहेत असे खोटे सांगून मला भेटण्यास टाळाटाळ करीत असतात. तरी आपल्या पातळीवरती रागयड जिल्हा परिषदेचे अधिकारी हे प्रत्यक्ष कामकाजाच्या वेळी नागरिकांना सोयी-सुविधा मिळावी यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत, ही मागणी पत्राद्वारे केली आहे.







