रामनाथ गायकवाड यांचे निधन

। उरण । वार्ताहर ।

उरण येथील ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक रामनाथ सखाराम गायकवाड (92) यांचे मंगळवारी (दि.2) वृध्दापकाळाने निधन झाले आहे. गोवा मुक्ती स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या गायकवाड यांना अटकेची शिक्षाही झाली होती. यावेळी शहरातुन फुलांनी सजवलेल्या ट्रकवरुन त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेत स्वातंत्र्य प्रेमी नागरिक, मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी कोटनाका येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, एक मुलगी, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

Exit mobile version