रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

| हैदराबाद | वृत्‍तसंस्था |

रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना 5 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयाशी संबंधित अनेक समस्या असल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास देखील होत होता.

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी (दि.8) सकाळी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. मात्र, त्यांना हृदयाशी संबंधित अनेक समस्या असल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास देखील होत होता. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. मात्र त्यांनी आज पहाटे 3. 45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रामोजी राव यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 साली आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात मध्यवर्गीय कुटुंबात झाला. आशिया खंडातील सर्वात मोठी फिल्म सिटी असलेली रामोजी फिल्म सिटीची स्थापना त्यांनी केली. तब्बल 2 हजार एकरात 1996 साली ही रामोजी फिल्स सिटी सुरु करण्यात आली. बाहुबली हा भारतातील पहिला बिग बजेट सिनेमा याच रामोजी फिल्म सिटीत बनवला गेला. रामोजी राव यांनी 70 च्या दशकात ईनाडू या वृत्तपत्राची सुरुवात केली. ईनाडू वृत्तपत्राच्या माध्यमातून रामोजी राव यांनी ईटीव्हीची सुरुवात केली.

Exit mobile version