| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत शहरामध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. रमजान पर्वकाळात मुस्लीम बांधवांनी महिनाभर निर्जळी उपवास करत अल्लाहची उपासना (इबादत) केली. यावर्षी संपूर्ण रमजान पर्व मार्च महिन्यात उन्हाच्या तीव्रतेत पार पडले, तरीदेखील आबालवृद्धांचा उत्साह बघावयास मिळाला. कर्जत शहरातील सुन्नी जामा मस्जिदमध्ये नवीन कपडे परिधान करून सुगंधी अत्तर लावून मुस्लिम बांधव ईद साजरी करण्यासाठी सकाळी मस्जिदमध्ये पोहचले होते. नमाज अदा झाल्यावर मुस्लिम बांधवांनी मशिदी बाहेर एकमेकांना मिठ्या मारून शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे मस्जिद जवळ स्वतः हजर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.






