पोलादपुरात रानभाजी महोत्सव

कृषी विभागाच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन
पोलादपूर | वार्ताहर |
स्वातंत्र्यदिनी तालुका कृषी अधिकारी पोलादपूर कार्यालय येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत रानभाजी महोत्सव व विक्री असा उल्लेखनीय कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती नंदा चांदे यांनी केले. या रानभाजी महोत्सवप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, पंचायत समिती उपसभापती शैलेश सलागरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य लक्ष्मण मोरे व शेतकरी उपस्थित होते.
या रानभाजी रानभाजी महोत्सवात अळू, टाकळा, भारंगी फुले, रान मशरूम, भुईअली, आघाडा, कुडाच्या शेंगा, कावळा, पिलकी, दिंडा, पाथरी, पेंडा, माठ, शेवगा, कुडाच्या शेंगा विविध रानभाज्या प्रदर्शन व विक्री करण्यात आली. या कार्यक्रमात सन 2019-20 आणि 20-21 मध्ये कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कृषी सहाय्यक दत्तात्रेय नरुटे व संतोष मिसाळ यांचा राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. रानभाज्यांचा आहारात जास्तीत जास्त वापर करून पोषकतत्वे वाढवावीत, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी कैलास धुमाळ यांनी केले. यावेळी पोलादपूर तालुक्यातील असंख्य शेतकर्‍यांनी रानभाजी महोत्सवामध्ये रानातील निसर्गत: उगवणार्‍यां भाज्यांचे प्रदर्शन केले आणि शहरातील अनेक ग्राहकांनी या रानभाज्यांचे प्रदर्शन पाहून मोठया प्रमाणावर भाजी खरेदी केली.

Exit mobile version