। मुंबई । वृत्तसंस्था ।
संतोष परब यांच्यावरील कथीत जीवघेणा हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई हायकोर्टाकडून बुधवारीही निकाला येऊ शकला नाही. या प्रकरणी आता गुरुवारी सुनावणी होणार आहे. नितेश राणे यांना अटकेपासून दिलासा कायम असणार आहे. हायकोर्टाचे कामकाज सध्या दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत सुरु आहे. तीन वाजता कोर्टाची वेळ संपल्याने कामकाज थांबवण्यात आले. अटकपूर्व जामिनावर जोपर्यंत मुंबई हायकोर्टा आपला निकाल देत नाही तोपर्यंत नितेश राणे यांच्यासह अन्य आरोपींविरोधात कुठलीही कठोर कारवाई होणार नाही, अशी ग्वाही राज्य शासनाने हायकोर्टात दिली आहे