मजगांव शाळेत रंगले वार्षिक स्नेहसंमेलन

| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |

रायगड जिल्हा परिषद आदर्श मजगांव मराठी शाळेत चार दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सांगता वार्षिक स्नेहसंमेलनाने झाली. वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन युवानेते सुरज सुबोध महाडिक यांच्या शुभहस्ते फीत कापून व सरपंच पवित्रा चोगले यांनी श्रीफळ वाढवून करण्यात आली. चार दिवसीय क्रीडा महोत्सवात सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा तसेच, खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध गाणी व प्रबोधनपर विनोदी नाटकांचा समावेश होता. त्यात प्रामुख्याने रीमिक्स, शेतकरी, पारंपरिक, इंग्रजी कविता व हिंदी मराठी चित्रपटातील नृत्य आदी. वैविध्यपूर्ण गाण्यांचा अंतर्भाव केला होता.

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचक्रोशीतील राजकिय नेते, उद्योजक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केल्याचे शाळेचे मुख्याध्यापक हेमकांत गोयजी यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले. सुबोध महाडिक, नंदकुमार सोहनी व शैलैश काते यांनी आर्थिक सहकार्य केल्याचेही सांगितले. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निखील मानाजी, उपाध्यक्ष उमेश कोंडाजी, सदस्य योगेंद्र गोयजी, अमित कोळी, अभिनय कोळी, रूपेश अंबाजी, सरीता धसाडे, करूणा पाटील, पुजा भोईर, दिक्षा मिथुन भोईर इ. नी सहकार्य केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षा नांदगावकर व चेतन चव्हाण यांनी केले. तर मनिषा भोईर यांनी आभार प्रदर्शन केले. प्रमिला फुंदे, रंजिता केमकर, श्रुती आयरकर, नेहा डावरे, सिद्धेश फेंगडू यांनी नृत्यदिग्दर्शन केले.

Exit mobile version