। चिपळूण । संतोष पिलके ।
विविध सायकल स्पर्धांच्या यशानंतर चिपळूण सायकलिंग क्लबने 1 मे रोजी प्रथम राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धा आयोजित केली होती. जवळपास 92 स्पर्धक राज्याच्या विविध कानाकोपर्यातून सहभागी झाले होते, ज्यामध्ये राज्य व देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंचा देखील यात समावेश होता.
स्पर्धेचं आयोजन राज्यस्तरीय/ जिल्हास्तरीय / महिला गट असे तीन गटात करण्यात आले होते.
स्पर्धेची सुरवात सकाळी 6 वाजता बहादुरशेख नाका चिपळूण येथून झाली व सांगता राज्यस्तरीय गटासाठी कुंभार्ली घाटमाथा तर जिल्हास्तरीय आणि महिला गटासाठी सोनपात्र येथे झाली.राज्यस्तरीय स्पर्धा अत्यंत अटीतटीची व चुरशीची झाली. फक्त एक सेकंदाच्या फरकाने पहिले तीन विजेते ठरले.
राज्यस्तरीय गटात हनुमंत चोपडे, जिल्हास्तरीय गटात प्रशांत पालवणकर, महिला गटात आर्या कोवळे प्रथम विजेते घोषित झाले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे
राज्यस्तरीय गट (29 किलोमीटर ) 1-हनुमंत चोपडे (नारायणगाव)2-सिद्धेश पाटील (कोल्हापूर),3-ओंकार खेडकर (पुणे),4) आर्यन मरळ (पुणे ), 5) विठ्ठल भोसले (बारामती), 6) सुहेल मुकादम (महाड)
जिल्हास्तरीय गट (22 किलोमीटर )1) प्रशांत पालवणकर (दापोली) 2) रोशन भुरण (चिपळूण), 3-केतन पालवणकर (दापोली)
महिला गट (22 किलोमीटर )
1) आर्या कवळे (खेड), 2-मृणाल खानविलकर (दापोली) 3) धनश्री गोखले (चिपळूण)
सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, शुद्धपाणी व्यवस्था, नाष्टा व चहा व्यवस्था तसेच आपत्कालीन सेवा म्हणून रुग्णवाहिका अशा विविध सेवा प्रशांत यादव, पिंट्या पाकळे, सोनललक्ष्मी घाग, साईश्वरी हॉस्पिटल, आदित्य आर्थोपेडिक हॉस्पिटल, विठाई हॉस्पिटल, सिद्धेश लाड, प्रशांत दाभोळकर, अपरांत हॉस्पिटल, विवेक केळकर, प्रसन्न बापट, सुमंत केळकर,गुरुनाथ भिडे, काळकाई एग्रो, खिडकीवडा, चिपळूण यांनी प्रायोजकत्व स्विकारले. स्पर्धेची फोटोग्राफी यूट्यूबर् महेश दाभोळकर मुंबई, संकेत हळदे चिपळूण यांनी केली.स्पर्धेमध्ये डी.बी.जे. कॉलेज चे एन.एस.एस. चे विद्यार्थी यांनी स्वयसेवक म्हणून काम केले याचबरोबर स्पर्धेला लाभलेल्या सर्व देणगीदारांचे चिपळूण सायकलिंग क्लबच्या वतीने आभार मानण्यात आले.






