। अलिबाग । वार्ताहर ।
प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत चेंढरेच्या उपसरपंच प्रणिताा म्हात्रे आयोजित केलेल्या देशभक्तीपर रांगोळी स्पर्धेचा 20 फेब्रुवारीला बक्षीस वितरण सोहळा साईनगर मित्रमंडळ, समाज मंदिर हॉल येथे पार पडला. या रांगोळी स्पर्धेत प्राजक्ता म्हात्रे प्रथम क्रमांक, मनिषा फाळके द्वितीय क्रमांक, तर, माधुरी माने हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य संजय पाटील, चेंढरे माजी उपसरपंच आरडीसीसी बँक संचालक अॅड. परेश देशमुख, सरपंच स्वाती पाटील, देसाई, माळवदे, अभिजीत सातमकर, सदस्य रोहन पाटील, प्रताप म्हात्रे व ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.







