पर्यटकांना खुणावताहेत रांजण खळगे

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
नव्याने उदयास आलेले उंचावरील थंड हवेचे ठिकाण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील माचाळ हे गाव. याच माचाळ गावातून मुचकुंदी नदीचा उगम होतो. याच नदीच्या प्रवाहात अनेक रांजण खळगे आणी धबधबे बनवत खाली खोरनिनको येथे सह्याद्रीतून येणार्या इतर नद्यांना मिळते.
मुचकुंदी नदीतील सात धबधबे आणि त्या खालील दहा रांजण खळगे म्हणजे साहसी पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. आजूबाजूला गर्द झाडी, कड्या-कपार्‍यांतून काढावा लागणारा मार्ग, रांजण खळग्यातून पोहून पुढे जाण्याचे थ्रिल अंगावर रोमांच आणणारेच आहे. हा जिद्दी माऊटेनिअर्स्च्या सदस्यांचा अनुभव असून साहसी पर्यटकांसाठी हे ठिकाण म्हणजे आवाहान आहे.

Exit mobile version