रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण झाले अलिबागकर

तब्बल 90 गुंठे जागा केली खरेदी!
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीरसिंग आणि दीपिका पदुकोण हे आता अलिबागकर झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे 90 गुंठे एने जागा 22 कोटीला खरेदी केली आहे त्या जागेच्या काही कागदोपत्री कामाच्या पुर्तेसाठी ते आज आलिबाग  येथील दुय्यम निबंधक कार्यलयात आले होते.

खरंतर सिनेसृष्टीमधील सिनेकलाकार नेहमीच आपल्या राहणीमानासाठी सतत चर्चेत असतात त्यांच राहणीमान हे अतीशय उच्च दर्जाच असंत ते सर्वसामान्यांना भुरंळ घालणार असतं मग ते राहत असणाऱ्या मुंबई मधील उच्चभ्रू सोसायटी असो वा सुट्ट्या घालविण्यासाठी त्यांनी घेतलेले रेसॉर्ट.

मात्र आजकाल सर्व कलाकारांना निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडत आहे आणि त्यासाठी ते हवी तेवढी किंमत द्यायला तयार असतात अशातच आता रणवीर सिंगआणि दीपिका पदुकोणने चक्क 90 गुंठे जागाच अलिबागमध्ये घेतली आहे या जागेत दोन बंगले असून काही नारळ सुपारीची बाग असल्याची माहिती मिळाली आहे. आणि या जागेचे रजिस्टर आज हे पती-पत्नी अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यलयात आले होते. मात्र या दोघांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Exit mobile version