अल्पवयीन मुलीवर बलात्कार

| पनवेल | वार्ताहर |

तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी फैय्याज महंमद शेख याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोकसोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील पीडित मुलगी पनवेल रेल्वे स्टेशन रोड परिसरात राहणारी असून, तिचे अपहरण केल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्या मुलीचा शोध घेतला असता तिने आरोपी फैय्याज शेख याने त्याच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना दिली. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. याप्रकरणी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा पाटील अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version