अल्पवयीन विवाहितेवर बलात्कार; चुलत सासर्‍याला सक्तमजुरी

माणगाव सत्र न्यायालयाचा निकाल
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
घाटावरून मेंढरं घेऊन कोकणात येणार्‍या एका धनगर कुटूंबातील अल्पवयीन विवाहितेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन माणगावच्या विशेष व सत्र न्या.पी.पी.बनकर यांनी आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी तसेच दीड लाखांचा दंड ठोठावला होता.याच आरोपीने अलिबाग येथील नेहुली कोरोना सेंटरमधून पलायनही केले होते.

वरंध घाटातील एका टपरीमध्ये तसेच एका मंदिराच्या पडवीमध्ये तीनवेळा बलात्कार केल्याचा गुन्हा 13 जानेवारी 2018 रोजी घडला. याप्रकरणी पोलादपूर पोलीसांनी तिच्या चुलत सासर्‍याला अटक केली होती. धारवली या गावामध्ये सध्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खेडेगांव ब्राह्मणदरा गुळूंचे येथून धनगर कुटूंब मेंढरं घेऊन दरवर्षीप्रमाणे आले आहे. यापैकी एका अल्पवयीन विवाहितेला, तिचा चुलत सासरा याने तिला, तिचा नवरा नवनाथ याने दुसरी बायको केली असल्याची बतावणी करीत नवर्‍याचे ठिकाण दाखविण्याचे निमित्त करून तिला आणि तिच्या सासर्‍यांना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यापर्यंत नेले.

याठिकाणी तिच्या सासर्‍याला मोटारसायकलवरून उतरविले आणि वाहितेला वरंध पुणे रस्त्यावरील वरंध घाटात रस्त्यालगत राजमाता असे लिहिलेल्या टपरीमध्ये नेऊन तिला मारहाण करून दोनवेळा जबरदस्तीने चुलत सासर्‍याने शरीरसंबंध ठेवले.या प्रकरणाची तक्रार दाखल होताच पोलादपूर पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक करुन न्यायालयात आरोपपत्र सादर केले. या खटल्यात पिडीत अल्पवयीन विवाहितेची साक्ष महत्वाचा पुरावा ठरला.त्यावरुन न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली.

Exit mobile version