| पनवेल | प्रतिनिधी |
सावत्र बापाने मुलीवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना कामोठेमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी 43 वर्षीय नराधम बापाविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामोठे, सेक्टर 18 येथे पीडित मुलगी आई-वडिलांसह राहते. यावेळी मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेत सावत्र बापाने तिच्यावर अत्याचार केला. याची माहिती पीडित मुलीने आईला दिल्यानंतर आईने मुलीसह कामोठे पोलीस ठाणे गाठले. तसेच नराधम बापारविरोधात तक्रार केली. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.